गणेशोत्सवात घुमणार पारंपारिक वाद्यांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:11 PM2017-08-17T13:11:09+5:302017-08-17T13:11:09+5:30

श्रीगोंदा हिंदू- मुस्लीम ऐक्याची भूमी आहे. गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करू, परंतु प्रशासनाने गणेश मंडळांना तातडीने रात्रभर वीज कनेक्शन व पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी सवलत द्यावी, अशी भावना श्रीगोंदा येथील बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी व्यक्त केली

ganesh,festival,plice,meeting, | गणेशोत्सवात घुमणार पारंपारिक वाद्यांचा आवाज

गणेशोत्सवात घुमणार पारंपारिक वाद्यांचा आवाज

googlenewsNext
ठळक मुद्देशांतता समिती बैठक : नियमांच्या चौकटीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन
्रीगोंदा : श्रीगोंदा हिंदू- मुस्लीम ऐक्याची भूमी आहे. गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करू, परंतु प्रशासनाने गणेश मंडळांना तातडीने रात्रभर वीज कनेक्शन व पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी सवलत द्यावी, अशी भावना श्रीगोंदा येथील बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी व्यक्त केली गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शांतता समिती व मंडळ प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे. पोलीस प्रशासनाची सकारात्मक दृष्टीने मदत करण्याची तयारी आहे. नंदकुमार ताडे यांनी ढोली बाजा वाजविण्यासाठी परवानगी मिळावी, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्ते खड्डे बुजविण्यात येतील, असे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे म्हणाले, यंदा दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे कोणावरही वर्गणीसाठी सक्ती करु नये. याबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. वाद्यांच्या आवाजावर मर्यादा ठेवावी लागेल. डीजे वाजविल्यास संबंधित मंडळाच्या अध्यक्षाविरुध्द गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सन २०१६ चा गणेशोत्सव शिस्तबध्दबपणे साजरा केल्याबद्दल सद्भावना, हनुमान व राष्ट्र तेज या गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अवैध धंदे व गुन्हेगारांच्या विरोधात मोहिम सुरु केल्याबद्दल पोलीस निरीक्षक पोवार यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, राजू गोरे, घन:श्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, सतीश बोरा, राजेश डांगे, सतीश पोखर्णा, नंदकुमार ताडे, प्रशांत दरेकर, नाना कोंथिबिरे उपस्थित होते.

Web Title: ganesh,festival,plice,meeting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.