शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

खासदार गांधी यांचा पत्ता कट ? डॉ. सुजय विखे भाजपच्या मैदानात ?

By नवनाथ कराडे | Published: March 09, 2019 8:29 PM

सतराव्या लोकसभा निवडणुकीतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार होणार याबाबत चर्चा चांगलीच रंगात आली आहे.

नवनाथ खराडेअहमदनगर : सतराव्या लोकसभा निवडणुकीतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार होणार याबाबत चर्चा चांगलीच रंगात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी नेमके रिंगणात कोण उतरणार? याचे उत्तर मिळत नाही. तर शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे ही जागा भाजपची आहे, मात्र विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकिट देण्यासाठी पक्षही उत्सुक नसल्याचे दिसत आहे. तर डॉ. सुजय विखे हे गेल्या दोन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र राष्ट्रवादी त्यांच्यासाठी जागा सोडत नाही. त्यामुळे नेमके रिंगणातील उमेदवार कोण? याबाबत राज्यभरात चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. विखे हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता आपोआपच कट होईल.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी दोन वर्षापासून तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. काँग्रेसला जागा सोडण्यास शरद पवार तयार नाहीत. डॉ. विखेही राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. अशातच विखे यांनी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचे दरवाजेही ठोठावल्याची चर्चा आहे. अशातच भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन आज (शनिवार, ९ मार्च २०१९) नगरमध्ये दाखल होत बैठकही घेतली. यावेळी ‘राजकारणात काहीही होऊ शकते’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. त्यामुळे विखे यांच्या भाजप प्रवेशाला दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात डॉ. सुजय विखे भाजपात प्रवेश करून तिकिट पदरात पाडून घेतील, असा अंदाज बांधला जात आहे.विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजपही उत्सुक दिसत नाही. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपनेही उमेदवारांची शोधाशोध सुरु केल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी खासदार झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना २ लाख ५० हजार ५१ एवढी मते मिळाली. तर काँग्रेसच्या तिकिटावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस रिंगणात होते. त्यांना १ लाख ८८ हजार २५१ मते पडली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना २ लाख ७८ हजार मते मिळाली. २८ हजार ४५७ मतांनी गांधी विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याचा फायदा गांधी यांना यावेळी झाला. त्यानंतर २००४ मध्ये खासदार गांधी यांना पक्षाने तिकिट नाकारले. विधानपरिषद सभापती प्रा. ना.स. फरांदे यांना भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु प्रा. फरांदे यांना मतदारांनी नाकारले. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख खासदार झाले. त्यानंतरील भाजपाच्या केंद्रिय नेतृत्वात बरेच बदल झाले. त्यामुळे २००९ मध्ये खासदार गांधी यांनी पुन्हा तिकिट मिळाले. यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार शिवाजी कर्डिले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. तर दिवगंत राजीव राजळे हे बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरले. या निवडणुकीत कर्डिले यांना २ लाख ६५ हजार ३१६ मते मिळाली. राजीव राजळे यांना १ लाख ५२ हजार ७९५ मते मिळाली. तर गांधी यांना ३ लाख १२ हजार ४७ एवढी मते मिळाली. यावेळी ४६ हजार ७३१ मतांनी गांधी यांनी विजय मिळविला. त्यानंतर २०१४ मध्ये दिलीप गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजीव राजळे मैदानात होते. मात्र मोदी लाटेत गांधी पुन्हा खासदार झाले.गेल्या पाच वर्षात गांधी यांच्याविरोधात सर्वसामान्यांची नाराजी वाढलेली दिसून येत आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्येही मतदारांनी खासदार गांधीना भरसभेत थेट प्रश्न विचारून पेचात पाडले. यावेळी राग अनावर झाल्याने मतदारांवर बरसलेले खासदार गांधी महापालिका निवडणुकीच्या वेळी सर्वांना दिसले. त्यानंतरही असे प्रसंग पाहावयास मिळाले. एकूणच शहरात भाजपाअंतर्गत गटातटाचे राजकारणही आजही पाहावयास मिळत आहे. आगरकर गट आणि गांधी गट आपआपले वेगळे राजकारण करत आहेत. एकमेंकाविरोधात तक्रारी थेट पक्षप्रमुखांकडे करतात. या गटातटाचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपाला बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अ‍ॅड.अभय आगरकर यांना पराभव स्विकारावा लागला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपद खासदार गांधी यांच्याकडे आहे. मात्र त्यांना शहरात पक्षाची ताकद म्हणावी तितकी वाढवता आली नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे अपयश गांधी यांना स्विकारावे लागले. महापालिकेत ६८ नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजपाचे फक्त १४ नगरसेवक आहेत. केवळ शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने भाजपचा पहिल्यांदा महापौर झाला. मात्र भाजपाला शहरातील मतदारांनी सपशेल नाकारले. याचवेळी खासदार गांधी याचे पुत्र सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांनाही पराभव स्विकारावा लागला. हा गांधी यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली फक्त १४ जागांवर विजय मिळविता आला. याशिवाय भाजपने केलेल्या तब्बल तीन सर्व्हेमध्ये ६० टक्के लोकांनी खासदार गांधी यांच्यावर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपकडून सर्व्हेमध्ये पसंती दर्शवली. मात्र यापैकी भानुदास बेरड वगळता कोणीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार नसल्याचे सूत्रांकडून कळते. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार पक्षपातळीवर झालेला असावा. त्यामुळे भाजप नवीन उमेदवारांची चाचपणी करत असावा.भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ.विखे यांना अनेकवेळा भाजपमध्ये येण्याची खुली आॅफर दिली आहे. ‘विखे हे भाजपकडूनच खासदार होतील’, असेही वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळे आमदार कर्डिले यांची भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील