शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 8:26 PM

Accident Case : मृतांमध्ये दोन पुरुष एक महिला व एका बालकाचा समावेश आहे. सर्व भाविक मध्यप्रदेशमधील असल्याचे समजते.

राहुरी-देवळाली प्रवरा (जि.अहमदनगर) : नगर-मनमाड राज्यमार्गावर रविवारी दुपारी चारच्या सुमारास एसटी बस व कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकलीसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. रविवारी दुपारी साडेतीन वाजता नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी जवळ गुहापाट येथे हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहेत. मृतांमध्ये सासू-सून, एक बालक आणि चालकाचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील खरगोन येथील तारे कुटुंबातील सदस्य कारने शिर्डीहून पुण्याकडे चालले होते. कार (क्रमांक एम. पी. १०-सी. बी.- १२३६) ही गुहा पाटाजवळ आली असताना, नगर-सटाणा ही एसटी बस (एम. एच.-१४, ४५०२) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील रंजना दीपक तारे (वय ५५), प्रतीक्षा विपुल तारे (वय ३५), लुणय विपुल तारे (वय ७), चालक जगदीश राठोड (वय ३५) हे जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. विपुल दीपक तारे (रा.पुणे) हे अपघातात जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विपुल हा कुटुंबातील एकमेव सदस्य बचावला आहे.चालक ताब्यातशवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. बस चालक भाऊसाहेब कुंडलिक गोराणे (सटाणा डेपो) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या भागात रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे सुरू झालेली अपघाताची मालिका सुरूच आहे. तीन महिन्यांत पंधरापेक्षाही अपघात झाले असून, १५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदार कंपनीने आवश्यक तेथे सूचना फलक लावलेले आहेत.

स्थानिकांचे मदतकार्य

घटना घडताच येथील स्थानिक नागरिक दिलीप बोरुडे, शशी वाबळे, राजेंद्र बोरुडे, विवेक लांबे, ओहोळ, अमर वाबळे, वैभव लांबे, सागर लांबे, सूरज ओहोळ, शशी कोळसे आदींनी मदतकार्य केले. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सज्जन नाहेडा, दिनकर गर्जे, लक्ष्मण बोडखे, रोहित पालवे, सोमनाथ जायभाये, गणेश लिपणे, रवींद्र कांबळे आदी पोलिसांनी मदत कार्य करून, उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी साई प्रतिष्ठाण, शिवबा प्रतिष्ठाण, भीमतेज तरुण मंडळ, १०८ नंबरची रुग्णवाहिकाही तत्काळ घटनास्थळी पोहोचली..  

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू