आत्महत्या केलेल्या शेतमजुराची ४ मुले आजीसह साई अनाथाश्रमात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:06 AM2020-03-04T05:06:05+5:302020-03-04T05:06:21+5:30

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका आत्महत्याग्रस्त शेतमजुराची चार बालके व आजीला साईनगरीतील साईआश्रयाने आधार देऊन नवजीवन दिले आहे. 

four children of a suicidal farm worker enter the Sai orphanage with their grandmother | आत्महत्या केलेल्या शेतमजुराची ४ मुले आजीसह साई अनाथाश्रमात दाखल

आत्महत्या केलेल्या शेतमजुराची ४ मुले आजीसह साई अनाथाश्रमात दाखल

Next

प्रमोद आहेर
शिर्डी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका आत्महत्याग्रस्त शेतमजुराची चार बालके व आजीला साईनगरीतील साईआश्रयाने आधार देऊन नवजीवन दिले आहे. साईबाबांची शिकवण अंगीकारून तब्बल १०९ अनाथ मुलांचा माय-बाप झालेल्या साई अनाथ आश्रमाच्या गणेश दळवी यांच्या सेवेने अनेक जण भारावून गेले आहेत़
तुकाराम व सविता हारके या पती-पत्नीत भांडणे व्हायची़ त्यातूनच सविताने आत्महत्या केली़ त्यापाठोपाठ तुकारामनेही जीवन संपवले़ यामुळे भागवत (९ महिने), गायत्री (२ वर्षे), ईश्वरी (६ वर्षे), वैष्णवी (९ वर्षे) व या मुलांची आजी कोंडाबाई (६५) हे निराधार झाले़
ग्रामस्थांनी या कुटुंबीयांना दहा दिवस भाजी-भाकरी दिली. नंतर मात्र उपासमार होऊ लागली होती़ आता हे सर्व शिर्डीतील साईआश्रय अनाथाश्रमात दाखल झाले आहेत.

Web Title: four children of a suicidal farm worker enter the Sai orphanage with their grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.