Former MP of the city Maruti Devaram alias Dada Patil Shelke passed away | नगरचे माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके यांचे निधन
नगरचे माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार दादा पाटील शेळके (वय 80) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. गेली काही महिने ते आजारी होते.  नगर नेवासा मतदारसंघातुन चार वेळा आमदार तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन दोनदा खासदार म्हणुन ते निवडून आले होते. 

दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान दिले. तसेच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. नगर पंचायत समिती सभापती जि.प. सदस्य असा पदापासुन सुरूवात करत त्यांनी खासदारकीपर्यत मजल मारली. राजकारणात असुनही साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक संस्था उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.

Web Title: Former MP of the city Maruti Devaram alias Dada Patil Shelke passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.