टेम्पोच्या धडकेत फुल विक्रेता ठार; ‘या’ टोलनाक्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 01:49 PM2021-01-22T13:49:15+5:302021-01-22T13:49:41+5:30

नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी (दि.२२) पहाटे झालेल्या अपघातात निलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय ३०, रा.जेऊर, ता.नगर) हा जागीच ठार झाला आहे.

Flower seller killed in tempo crash; Incident at ‘Ya’ Toll Naka | टेम्पोच्या धडकेत फुल विक्रेता ठार; ‘या’ टोलनाक्यावरील घटना

टेम्पोच्या धडकेत फुल विक्रेता ठार; ‘या’ टोलनाक्यावरील घटना

Next

केडगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी (दि.२२) पहाटे झालेल्या अपघातात निलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय ३०, रा.जेऊर, ता.नगर) हा जागीच ठार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारातील टोलनाक्यावर निलेश मेहत्रे व त्याचा भाऊ गोरख मेहेत्रे फुल व हार विक्रीचा व्यवसाय करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो (क्र. एम.एच.-१२, आर.एन. १९९९) टोलनाक्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कठड्याला धडकून उलटला. यावेळी कठड्याजवळ हार विकण्यासाठी उभारलेल्या निलेश मेहत्रे याला जबर मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी माजी सैनिक राजेंद्र बनकर व रघुनाथ पवार यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.

निलेश मेहेत्रे याच्यावर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. विनोद जाधोर, पी.एस.आय. दीपक पाठक, हवालदार रमेश थोरवे, पोलीस नाईक गणेश कावरे, पो. कॉ.संदीप आव्हाड, पो. कॉ. अनिल पवार यांनी घटनेचा पंचनामा केला. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

Web Title: Flower seller killed in tempo crash; Incident at ‘Ya’ Toll Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.