पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:41 PM2019-10-09T23:41:44+5:302019-10-09T23:42:07+5:30

नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते.

For fifty years we have been giving only the word, Sujay has revealed the secret of the family politics. | पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य

पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य

Next

अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून यावेळी अनेकजण इच्छुक होते. मात्र अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत. त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या’ असे ते म्हणाले. 

खासदार विखे वादग्रस्त विधानांमुळे सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला चालत नसतील तर तुमच्या खात्यावर जमा केलेले दोन हजार रुपये परत करा, ते गरिबांना वाटू हे त्यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना ताजी असतानाच विखे यांनी पुन्हा नगर येथे विखे कुटुंबाच्या ५० वर्षांतील राजकारणाचे रहस्य उलडले.

उद्धव यांनी टाळला लाल दिव्याचा उल्लेख
आपणाला लाल दिवा मिळणार, असा उल्लेख अनिल राठोड यांनी त्यांच्या भाषणात केला. इतर नेत्यांनीही या मुद्याला स्पर्श केला. मात्र, उद्धव यांनी आपल्या भाषणात या मुद्याचा उल्लेख केला नाही. राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. 

Web Title: For fifty years we have been giving only the word, Sujay has revealed the secret of the family politics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.