शेतीच्या वादातून मुलांनीच केली पित्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:22+5:302021-09-18T04:23:22+5:30

भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे, अशोक लक्ष्मण लोणारे (दोघे, रा. रांजणगाव, ता. नेवासा) या दोघा मुलांविरोधात त्यांची सावत्र आई सुनीता उर्फ ...

Father killed by children in agricultural dispute | शेतीच्या वादातून मुलांनीच केली पित्याची हत्या

शेतीच्या वादातून मुलांनीच केली पित्याची हत्या

Next

भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे, अशोक लक्ष्मण लोणारे (दोघे, रा. रांजणगाव, ता. नेवासा) या दोघा मुलांविरोधात त्यांची सावत्र आई सुनीता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (रा. कारेगाव, ता. नेवासा) हिच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मण लोणारे यांची पहिली पत्नी चंद्रकलाबाई लोणारे ही तिच्या दोन मुलांसह रांजणगाव (ता. नेवासा) येथे राहते. चंद्रकलासोबत घरगुती भांडणे होऊ लागल्याने लक्ष्मण लोणारे हे रांजणगावहून कारेगाव येथे राहण्यास आले. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये सुनीता हिच्याबरोबर दुसरा विवाह केला. त्यानंतर लक्ष्मण लोणारे यांची पहिली पत्नी चंद्रकलाबाई व तिची दोन मुले भाऊसाहेब व अशोक यांनी कारेगाव येथे येऊन लक्ष्मण लोणारे यांना जबर मारहाण केली होती. त्यावेळी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शुक्रवारी (दि.१० सप्टेंबरला) लक्ष्मण लोणारे बाजार करण्यासाठी घोडेगाव येथे गेले होते. त्यावेळी वडाळा येथे पहिली पत्नी चंद्रकला भेटली होती. तिने शेतीचा वाद लवकरात लवकर मिटवून घे नाही तर या आठवड्यात तुला संपवून टाकीन, अशी धमकी दिल्याचे लक्ष्मण लोणारे यांनी सायंकाळी कारेगाव येथे घरी आल्यावर दुसरी पत्नी सुनीता व बहीण परेगाबाई यांना सांगितले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहेत.

..............

हात, डोके, कपाळावर वार

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लक्ष्मण लोणारे हे प्रातर्विधीस शेतात गेले होते. बराच वेळ होऊनही ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी दुसरी पत्नी सुनीता शेताकडे गेली. त्यावेळी त्यांना भाऊसाहेब व अशोक लोणारे हे मक्याच्या शेतातून उसाकडे पळताना दिसले. त्यावेळी सुनीताने मक्याच्या शेतात जाऊन पाहिले असता लक्ष्मण लोणारे हे जखमी अवस्थेत पडलेले दिसले. सुनीताने आरडाओरड केली असता लक्ष्मण यांची बहीण परेगाबाई, भाऊ बाबासाहेब तेथे आले. लक्ष्मण यांच्या हात, डोके, कपाळावर धारदार शस्त्राचे वार झाल्याचे दिसून आले.

Web Title: Father killed by children in agricultural dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.