शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच; गारगुंडी, कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:28 PM

अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथे व सोमवारी दुपारी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसातील नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथे व सोमवारी दुपारी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसातील नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आहे.रविवारी सायंकाळी उशीरा पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील नितीन प्रकाश झावरे (वय ३८) या शेतकऱ्याने घरामधील पत्राच्या अँगला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नितीन हा गावामध्येच पत्नीसह शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी दिवसभर तो गावामध्येच होता. तो सायंकाळी उशीरा घरी आला. त्यानंतर पत्नी मंदीरामध्ये नैवद्य ठेवण्यासाठी गेली होती. ती परत आल्यानंतर दरवाजा वाजविला तरीही आतून काहीच आवाज आला नाही. नंतर तिने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला. तर घरामध्ये पत्र्याच्या अँगलला नितीन याने फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ते पाहून पत्नीने एकच हंबरडा फोडला. माजी सरपंच अंकुश भास्कर झावरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील दत्तवाडी परिसरातील महेश प्रभाकर कराळे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. आगडगाव रोडवरील एका झाडाला महेश यांनी गळफास घेतला. ते पदवीधर होते. एका महिन्यात नगर तालुक्यातील पाच शेतकऱ्यानी आत्महत्या केलेल्या घटना घडल्या आहेत. आत्महत्यांचे हे सत्र सुरुच असल्यामुळे नगर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या

सातत्याने दुष्काळी परिस्थिती, शेतमालाला भाव नसणे यामुळे शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येत नाही. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या संख्या वाढत आहे. आर्थिक अडचणीमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे गावकरी सांगत आहेत. नापिकीमुळे आणि शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे स्वप्नभंग झालेले नितीन झावरे गेल्या काही दिवसांपासून निराश होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfarmer suicideशेतकरी आत्महत्याParnerपारनेर