शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:32+5:302021-05-22T04:20:32+5:30

दहिगावने : शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व पिकाचे नियोजन करताना माती परीक्षण, बीज उगवण तपासणी, योग्य वाणाचा वापर, अचूक बीजप्रक्रिया, जीवाणू ...

Farmers should take advantage of KVK facilities | शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा

Next

दहिगावने : शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व पिकाचे नियोजन करताना माती परीक्षण, बीज उगवण तपासणी, योग्य वाणाचा वापर, अचूक बीजप्रक्रिया, जीवाणू खताचा वापर करावा. शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र दहिगावने अंतर्गत जागतिक मधुमक्षिका दिन व खरीप हंगाम पूर्वतयारी ऑनलाईन कार्यशाळा पार पडली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, अनिल शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. संदीप लांडगे यांनी मधुमक्षिका महत्त्व, मधनिर्मिती, वनस्पतीमध्ये परागीभवनासाठीचे महत्त्व विशद केले. नारायण निबे, सचिन बडधे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समन्वयक प्रवीण देशमुख, वैभव नगरकर, केव्हीके प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Farmers should take advantage of KVK facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.