शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उमेदवारांचे कुटुंब रंगले निवडणूक प्रचारात; नातेवाईकांच्या पायाला भिंगरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:14 PM

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व त्यांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. आर्थिक व्यवहारासह कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, सभांचे निमंत्रण, यासारख्या महत्वाच्या जबाबदाºया कुटुंंबातील तरुण मंडळींच्या खांद्यावर आहे. 

अण्णा नवथर ।  अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व त्यांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. आर्थिक व्यवहारासह कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, सभांचे निमंत्रण, यासारख्या महत्वाच्या जबाबदाºया कुटुंंबातील तरुण मंडळींच्या खांद्यावर आहे.  प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांसाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागत असल्याने उमेदवाराला एकट्याला ते करणे शक्य नाही. कुटुंबातील अन्य सदस्यही त्यांच्या मदतीला आहेत. अकोल्याचे भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांच्यासाठी वडील माजीमंत्री मधुकरराव पिचड, आई हेमलता या मतदारांशी संपर्क करत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ किरण लहामटे यांच्यासाठी वडील यमाजी आणि पत्नी पुष्पा हे प्रचारात उतरले आहेत. संगमनेरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी पत्नी कांचन, मुलगा ऋषिकेश, मुलगी डॉ़ जयश्री, बंधू इंद्रजित, बहीण नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुलगी शरयू देशमुख, जावई रणजितसिंह देशमुख हे निवडणूक प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्यासाठी बंधू अनिल, मुलगा अमित आणि पुतण्या आदित्य हे महत्वाची भूमिका बजावत आहेत. शिर्डीत गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे व मुलगा खासदार डॉ़ सुजय विखे हे मतदारांशी संपर्क करत आहेत.काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांच्यासाठी पत्नी मिनाक्षी या मतदारांशी संपर्क करत आहेत. राहुरीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्यासाठी पत्नी अलका, मुलगा अक्षय आणि पुतण्या संदीप यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आई उषा, वडील माजी खा. तनपुरे, चुलते अरुण हे प्रचार करत आहेत. कोपरगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी पती बिपीन, सासरे माजीमंत्री शंकरराव, भाया नितीन, भाया मिलिंद, मुलगा विवेक,  इशान, पुतण्या अमित, सुमित, स्नुषा मनाली, रेणुका, निकिता,जाऊबाई कलावती या मतदारांशी संपर्क साधत आहेत. आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्यासाठी वडील माजी आमदार अशोक काळे, आई पुष्पा, पत्नी चैताली, आत्या स्नेहल शिंदे, चुलते संभाजी, हे मतदारांशी संपर्क करत आहेत. अपक्ष राजेश परजणे यांच्यासाठी बंधू कृष्णा, पुतण्या विवेक, त्यांच्या पत्नी वैशाली, भगिनी मंदाबाई ढसाळ, पदमा दिवटे, मुलगी गायत्री आणि पूजा आदी सक्रिय आहेत. नेवाशात क्रांतिकारीचे शंकरराव गडाख यांच्यासाठी वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव, आई शारदाताई, बंधू प्रशांत, विजय, पत्नी सुनीता, चुलत बंधू सुनील, प्रवीण, चुलते विश्वास, मुलगा उदयन हे प्रचारात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा आणि मुलगा विष्णू हे मतदारांशी संपर्क साधत आहेत.शेवगावमध्ये भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यासाठी भाया राहुल, जाऊबाई मोनाली हे प्रचारात सक्रिय आहे. मोनिका राजळे यांचे चिरंजीव कृष्णा हे आॅस्ट्रेलियातून प्रचारासाठी आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासाठी वडील बबनराव, पत्नी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती, मुलगा ऋषिकेश, पुतण्या अनिल यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे. श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासाठी बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाशिव,पत्नी प्रतिभा, मुलगा विक्रमसिंह हे प्रचार करताना दिसतात. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्यासाठी भाऊ बाळासाहेब, पत्नी मनिषा, मुलगा प्रशांत, प्रवीण प्रचार करत आहेत. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यासाठी पत्नी माजी पंचायत समिती सभापती आशा या मतदारांशी संपर्क साधत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी आई सुनंदा, वडील राजेंद्र, सासरे सतीश मगर हे प्रचारात सक्रिय आहेत. तसेच आजोबा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित यांच्यासाठी सभा घेतल्या आहेत. पारनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय औटींच्या पत्नी जयश्री औटी, मुलगा अनिकेत, स्नुषा तृप्ती हे प्रचार करताना दिसतात. आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या प्रचारात सक्रिय आहेत.नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी वडील आमदार अरुण जगताप, आई पार्वती, पत्नी शीतल, बंधू सचिन, भावजयी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप या मतदारांशी संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी पत्नी शशिकला, मुलगा विक्रम हे प्रचार करताना दिसतात.काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांच्या पत्नी कविता, मुलगी डॉ. मितवा, बहीण गायत्री गुजरे तसेच त्यांचे बंधू अंकुश व पुतणे असे अख्खे कुटुंबच मोर्चा सांभाळत आहेत. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्याकरीता पत्नी माजी नगराध्यक्षा मंदाताई या प्रचारात सक्रीय आहेत.शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यासाठी गत निवडणुकीत वडील माजीमंत्री अशोक पाटील डोणगावकर आणि सासरे आप्पासाहेब राजळे यांची खंबीर साथ मिळत होती.यावेळी हे दोघेही आजारी असल्याने राजळे यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ़ सुजय विखे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ताकद उभी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019