शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; पक्ष निरीक्षकांसमोरच प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 2:46 PM

केंद्र सरकारविरोधात शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ यांच्या गटाने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, तर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिका-यांनी मार्केट यार्ड येथे आंदोलन केले. शहर काँग्रेसची एकाच मागणीसाठी दोन आंदोलने शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमदनगर : केंद्र सरकारविरोधात शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ यांच्या गटाने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, तर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिका-यांनी मार्केट यार्ड येथे आंदोलन केले. शहर काँग्रेसची एकाच मागणीसाठी दोन आंदोलने शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी व कामगारविरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. काँग्रेसच्या  प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी किरण काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  काँग्रेसच्या बाळासाहेब भुजबळ यांच्यासह उबेद शेख, आऱ आऱ पिल्ले यांच्यासह महिला पदाधिका-यांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. 

काही वेळाने किरण काळे, जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक डॉ़ अनिल भांबरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण हेही आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आले. ते येण्यापूर्वीच तिथे भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरणे धरले होते. या आंदोलनात काळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले नाही. ऐनवेळी आंदोलनाची जागा बदलण्याची नामुष्की काळे यांच्या गटावर आली.

पक्ष निरीक्षकांसमोरच काँग्रेसचे दोन गटकाँग्रेसचे जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ़ अनिल भांबरे हेही नगर दौ-यावर आले होते. तेही आंदोलनात सहभागी झाले. परंतु, त्यांच्यासमोरच शहर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी स्वतंत्र आंदोलने केल्याने शहर काँग्रेसची ही आंदोलने शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसPoliticsराजकारण