शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

नगर जिल्ह्यातील ६६ हजार शेतक-यांनी भरले वीजबिलाचे २२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 8:26 PM

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्दे२१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे.

अहमदनगर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरच्या अगोदर मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन सवलतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.शेतक-यांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार शेतक-यांकडे वीजबिलाची २ हजार २८५ कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे.

जोडणीनंतर ६६ हजार ग्राहकांनी एकदाही बिलच भरले नाही

वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबिलाची रक्कम न भरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ६५ हजार ६९६ इतकी आहे. तर दुसरीकडे महावितरणने गेल्या तीन वर्षात १ लाख १०४३ कृषिपंप ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही वीजबिल न भरणाºया जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त आहे. यातून महावितरणसमोरील आर्थिक अडचण लक्षात येऊ शकेल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण