शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:12 PM

राहुरी विधानसभा निवडणुकीचा अखेर डफ वाजला आहे़ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

राहुरी : राहुरी विधानसभा निवडणुकीचा अखेर डफ वाजला आहे़ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ तर तनपुरे यांनी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका करीत निवडणुकीपूर्वीच वातावरणात राजकीय रंग भरला़राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव दुशिंग यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली़ गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला़ तनपुरे यांनी आमदार कर्डिले यांचे नाव घेऊन राहुरीत त्यांनी कोणता प्रकल्प आणला? हे जाहीर करावे, असे आव्हान दिले़ कर्डिले हे केवळ शायनिंग आमदार असून त्यांना साधा ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी का लावता आला नाही? फसवी घोषणा करणाऱ्या आमदार कर्डिले यांनी तहसील कचेरी इमारत व जनावरांच्या दवाखान्याचा प्रश्न का सोडविला नाही? असा सवाल तनपुरे यांनी केला़मच्छिंद्र सोनवणे, संतोष आघाव, धिरज पानसंबळ, नवाज देशमुख, पंढरीनाथ तनपुरे, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब खुळे आदींची भाषणे झाली़ यावेळी सभापती मनिषा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, निर्मलाताई मालपाणी, प्रभाकर गाडे, रामभाऊ डौले, गंगाधर जाधव, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, निसार सय्यद, अतुल तनपुरे, सुरेश निमसे, प्रकाश भुजाडी, भारत रोकडे, संकेत पाटील, संदीप निकम, भाऊसाहेब चौधरी, केरू पानसरे आदी उपस्थित होते़कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याची आॅफर स्वीकारणार नाही़ राष्ट्रवादी काँगे्रस हा शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे़ राहुरीतील प्रश्न गेल्या १६ वर्षात सुटलेले नाहीत़ त्यामुळे मतदार सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे़ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठिशी जनता उभी राहील़ -प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी