Donation of Rs. 11 lakhs to Sai Baba from a third party in Chandigarh | चंदीगड येथील तृतीय पंथीयांकडून साईबाबांना अकरा लाखांची देणगी

चंदीगड येथील तृतीय पंथीयांकडून साईबाबांना अकरा लाखांची देणगी

शिर्डी : चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकाऱ्यांनी साईचरणी अकरा लाखांची देणगी अर्पण केली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे, यासाठी साईबाबांना साकडेही घातले.

    देणगीदार सोनाक्षी व त्यांच्यासह आलेल्या भाविकांचा साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी संस्थानच्या वतीने सत्कार केला.

यावेळी सोनाक्षी व त्यांच्या सहकारी म्हणाल्या, साईदर्शनाने आम्हाला आत्मिक शांती मिळाली. येथे दर्शन व्यवस्था व उपाययोजना अगदी उत्तम आहे. येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर चांगली शिस्त अनुभवाला आली. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी हे आवश्यकच आहे. सर्व साईभक्त मास्कचा वापर व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत.

 संस्थानकडून दर्शन, आरतीचा पास मोफत देण्यात येत होता. मात्र, त्यांनी त्यास नकार देऊन सशुल्क पासेस घेऊन साईंच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली.

Web Title: Donation of Rs. 11 lakhs to Sai Baba from a third party in Chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.