सभापती निवडीवरून शिवसेनेत असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:19 AM2021-03-07T04:19:56+5:302021-03-07T04:19:56+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्याची नामुष्की ओढवली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी ...

Dissatisfaction in Shiv Sena over election of Speaker | सभापती निवडीवरून शिवसेनेत असंतोष

सभापती निवडीवरून शिवसेनेत असंतोष

Next

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्याची नामुष्की ओढवली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी अर्ज मागे घेण्याचा परस्पर निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या स्व. अनिल राठोड यांच्या समर्थकांनी शनिवारी थेट मुंबई गाठली. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्याकडेच त्यांनी कैफियत मांडली.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची गुरुवारी (दि. ४) निवड झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनीही अर्ज दाखल केला होता. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. मात्र शिवसेनेतील काही नगरसेवक विरोधी गटात गेले. तसेच संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना पठारे यांना दिल्या. कोरगावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे सूचना दिल्याचे सांगितले होते. मात्र सेनेच्या नगरसेवकांना याबाबत शंका असल्याने २० ते २२ शिवसैनिकांनी शनिवारी थेट मुंबई गाठली. त्यामध्ये राठोड यांचे निष्ठावान नगरसेवक, माजी नगरसेवक होते. तिथे कोरगावकर यांच्या समोरच अर्ज माघारी घेण्याबाबत नेमका कोणाचा आदेश होता, याबाबत चर्चा झडली. यामुळे स्थानिक नगरसेवक विरुद्ध संपर्कप्रमुख असा सामना पहायला मिळाला. एकंदरीत सर्वच नगरसेवकांनी कोरगावकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. याबाबत काही नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही वेगळ्या कारणाबाबत देसाई यांची भेट घेतल्याचे सांगितले.

Web Title: Dissatisfaction in Shiv Sena over election of Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.