वीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत, अजित पवार यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:55 AM2021-01-31T06:55:40+5:302021-01-31T06:56:05+5:30

राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल

Discount on payment of arrears of power pumps | वीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत, अजित पवार यांचे आश्वासन

वीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत, अजित पवार यांचे आश्वासन

Next

राहुरी (जि. अहमदनगर) : राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ग्रामपंचायतींनी शासकीय जमीन महाविरतणला उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही दरवर्षी महावितरणकडून हक्काचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.

 राहुरीत सहा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. पवार म्हणाले, ‘कृषी वीज बिल वसुलीसाठीच्या या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. नगर जिल्ह्यात ४ हजार ९९८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. जिल्ह्यात वसूल होणाऱ्या रकमेपैकी ६६ टक्के निधी वीजनिर्मितीच्या, वीज वितरणाच्या जिल्ह्यातील  पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत जिराईत जमीन शेतकऱ्यांनी महावितरणला उपलब्ध करून दिल्यास एकरी ३० हजार रुपये महावितरणकडून दिले जातील, असे पवार म्हणाले. 

शासकीय जमिनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या तर दरवर्षी त्यांनाही उत्पन्नाचा एक निश्चित स्रोत उपलब्ध होईल. वांबोरी चारीच्या  सुधारित दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.’ निळवंडे धरणाच्या कालव्याची  कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले. 

हे पठ्ठे येथे विनामास्क फिरताहेत, यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का
वांबोरी (ता. राहुरी) येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात विनामास्क आलेल्या लोकांना पाहून अजित पवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच  चढला. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट आले आहे. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. अनेक जण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. हे बघा हे पठ्ठे येथे विनामास्क फिरत आहेत. आता यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का, अशा शब्दांत पवारांनी आपला संताप व्यक्त केला.

Web Title: Discount on payment of arrears of power pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.