शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:48 AM2020-01-19T10:48:36+5:302020-01-19T10:52:33+5:30

साई जन्मभूमी वादाच्या मुद्दयावर शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Devotees visit Shirdi Sai Baba temple amid bandh called today in Shirdi town | शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

शिर्डी - साई जन्मभूमी वादाच्या मुद्दयावर शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावून साईबाबावर श्रद्धा तर शिर्डीवर विश्वासाची मोहर उमटवली आहे.

मध्यरात्रीनंतरच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सगळ्या बाजारपेठा बंद आहेत. रिक्षा, तांगे, फळ विक्रेते या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. बंद अगोदरच जाहीर करूनही भाविकांच्या गर्दीवर कोणताही परिणात झालेला नाही. दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

संस्थान प्रसादालय रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू होते, यानंतर पहाटे एक वाजल्यापासूनच प्रसादालयाचा भटारखाना सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजता प्रसादालय सुरू होते आज सकाळी साडेनऊ वाजताच सुरू करण्यात आले आहे. संस्थानने रोजच्या प्रमाणे नास्ता पाकिटांची व्यवस्था केली आहे. संस्थान कॅन्टीनमध्ये चहाचीही व्यवस्था आहे. दुपारी साडे बारापर्यंत नास्ताची पाकिटे दिली जाणार आहेत.

विशेष म्हणजे ग्रामस्थांनी सकाळी दोन हजाराहून अधिक नास्ता पाकिटे आणून भाविकांना वाटली. याशिवाय ग्रामस्थ भाविकांसाठी इडली, सांबर आदी प्रकारचा नास्ता बनवत असून सकाळी दहा नंतर ते भाविकांना देण्यात येणार आहे. भाविकांना स्वयंसेवक मार्गदर्शन करत आहेत. भाविकांना कोणताही त्रास होवू नये म्हणून ग्रामस्थ विशेष खबरदारी घेत आहेत. शहरातील गल्ल्यांमध्ये शांतता असली तरी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद

ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका

कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा पीएफ योजनेस पात्र- सर्वोच्च न्यायालय

लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार

CAA लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही- कपिल सिब्बल

 

Web Title: Devotees visit Shirdi Sai Baba temple amid bandh called today in Shirdi town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.