महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:39 AM2021-03-04T04:39:42+5:302021-03-04T04:39:42+5:30

अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. १ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ...

Demand for money by opening a Facebook account in the name of the revenue minister's daughter | महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

Next

अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. १ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. हे खाते त्वरित बंद करुन तपास करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. गुगल पे व फोन पे द्वारे पैसे मागितल्याचे स्क्रिन शाॅट त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.

Web Title: Demand for money by opening a Facebook account in the name of the revenue minister's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.