किमान वेतनाचा लाभ मिळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:37+5:302021-07-07T04:25:37+5:30

अहमदनगर : शहरात कामगारांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल ...

Demand for minimum wage benefits | किमान वेतनाचा लाभ मिळण्याची मागणी

किमान वेतनाचा लाभ मिळण्याची मागणी

Next

अहमदनगर : शहरात कामगारांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात सोमवारी उपोषण करण्यात आले.

या आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, बबनराव वाघुले, श्रीहरी लांडे, सुभाष आल्हाट, दीपक चांदणे, प्रसन्न सटाळकर, विनोद साळवे, शाहीर कान्हू सुंबे, शामवेल थोरात, विजय वहाडणे, राम कराळे, डॉ. संतोष लांडे, महेश काळे आदींसह कामगार सहभागी झाले होते.

कोरोना महामारीच्या काळामध्ये कंपनी व्यवस्थापनाने अनेक कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. जुन्या कामगारांना पूर्वसूचना न देताच कंपनीतून कामावरून त्यांना काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात आली आहे. या कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेने पुढाकार घेतला आहे.

कंपनीने कामगारांना किमान वेतनाचा लाभ न देताच कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. यास जबाबदार अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. कामगारांवर अन्याय व फसवेगिरी करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात म्हटले आहे.

पीएफ व किमान वेतन याचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला नाही, अशा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. काही कंपन्या, खासगी संस्थांनी कायम कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटीची रक्कम दिली नाही. हंगामी कामगारांना किमान वेतन न देता जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या कामगारांना कामावर परत घ्यावे. बांधकाम कार्यालयात अनेक कामगारांना ऑनलाईन नोंदणीचा फटका बसला असून, नोंदणी करूनही अद्याप त्यांना शासकीय आर्थिक मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यांना तत्काळ लाभ देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

----------

फोटो-०५क्रांतिवीर सेना

शहरात कामगारांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण करण्यात आले.

Web Title: Demand for minimum wage benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.