अकोलेतील निविदा रद्दचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:05+5:302020-12-08T04:19:05+5:30

अकोले : नगरपंचायत हद्दीतील काळभैरव टेकडीवर हिरवाई नांदावी व पक्ष्यांचा किलबिलाट वाढवा या हेतूने वृक्षारोपण-संगोपनासाठी काढण्यात आलेली ४५ लाख ...

The decision to cancel the tender in Akole is in doubt | अकोलेतील निविदा रद्दचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात

अकोलेतील निविदा रद्दचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात

Next

अकोले : नगरपंचायत हद्दीतील काळभैरव टेकडीवर हिरवाई नांदावी व पक्ष्यांचा किलबिलाट वाढवा या हेतूने वृक्षारोपण-संगोपनासाठी काढण्यात आलेली ४५ लाख रुपयांची निविदाप्रक्रिया रद्द झाली. मात्र, निविदाप्रक्रिया रद्द होणे, ही बाब संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पानसरवाडी भागातील ही माळरान टेकडी वृक्षवेलींनी बहरावी, पक्ष्यांचा किलबिलाट कानी गुंजावा या उद्देशाने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आपल्या मातीतील देशी झाडांची लागवड अपेक्षित आहे. वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे, पोषक खते टाकणे, झाडांची रोपे आणून ती लावणे, ट्री-गार्ड बसविणे, वर्षभर पाणी, निगा राखत संगोपन करणे या बाबींसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. नाशिक येथील दोन व जालना येथील एक अशा तीन निविदा अखेरपर्यंत टिकून होत्या. कागदपत्रे पडताळणीत त्यातील एक निविदा बाद झाली. दोन संस्थेच्या निविदा राहिल्या. यातील ‘बिलो’ टेंडरवाल्याला काम देणे अपेक्षित असताना हा विषय स्थायी समितीच्या पुढे आला आणि ही निविदा प्रक्रिया रद्द झाली.

-----

स्थायी समितीने पहिली निविदाप्रक्रिया रद्द केली. पुन्हा दुसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या कॉलला किमान तीन संस्थांच्या निविदा असणे अपेक्षित असते तसे न झाल्याने पहिली निविदाप्रक्रिया रद्द झाली.

-विक्रम जगदाळे,

मुख्याधिकारी, अकोले

Web Title: The decision to cancel the tender in Akole is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.