शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावरील गटार फुटली : नागरिकांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 5:31 PM

अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा व स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले.अनेक दिवसापासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भुमीगत गटार फुटल्याने ...

अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा व स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले.अनेक दिवसापासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भुमीगत गटार फुटल्याने मैलमिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन त्याचे डबके साचले आहे. या घाण पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये हे मैलमिश्रीत पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुगंर्धीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असताना आरोग्याच्या दृष्टीकोनाने मनपा प्रशासनास जाग आनण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. एका व्यावसायिकाने गटारीवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण टाकल्याने ही भुमीगत गटार फुटली आहे. यामुळे टाकलेल्या कुंपनाच्या आत देखील मैलमिश्रीत पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या भुमीगत गटारीवरील अनाधिकृत कुंपन हटवून या गटारीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, ललिता गवळी, वसुधा शिंदे, यशवंत शिंदे, लक्ष्मण पवार, गणेश दाते आदींसह नागरिक सहभागी झाले होते. या भागात पालकमंत्री, उपायुक्त व महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वास्तव्यास असून देखील या नागरी समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तातडीने या गटारीची दुरुस्ती न झाल्यास नगर-मनमाड रास्ता रोकोचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeप्रा. राम शिंदे