Coronavirus: घाटकोपरहून नगरला आलेल्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 09:22 AM2020-05-15T09:22:59+5:302020-05-15T09:23:17+5:30

घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावाकडे परतायचे होते.  तिथेच या महिलेला त्रास जाणवत होता. मात्र, नगरमध्ये आल्यावर रस्त्यातच जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली होती.

Coronavirus: A 30-year-old woman from Ghatkopar contracted coronavirus | Coronavirus: घाटकोपरहून नगरला आलेल्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

Coronavirus: घाटकोपरहून नगरला आलेल्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

Next

अहमदनगर - घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहत असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने  तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास जाणवत होता.  तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात ती बाधित असल्याचे आढळले. मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो मुंबईमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.

घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावाकडे परतायचे होते.  तिथेच या महिलेला त्रास जाणवत होता. मात्र, नगरमध्ये आल्यावर रस्त्यातच जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली होती. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तिची तात्काळ तपासणी करण्यात आली होती. त्यात ती महिला बाधित असल्याचे आढळून आले. यापूर्वीही जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेली व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तो बाधित रुग्ण आष्टी (जि. बीड) येथील होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल मध्ये उपचार केले होते.

Web Title: Coronavirus: A 30-year-old woman from Ghatkopar contracted coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.