Coronation of 35 accused in Upakaragriha; 34 people moved to the city | श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ आरोपींना कोरोनाची बाधा; ३४ जणांना नगरला हलविले

श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ आरोपींना कोरोनाची बाधा; ३४ जणांना नगरला हलविले

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

समजलेली अधिक माहिती अशी की, कोठडीतील काही आरोपींना ताप आला होता. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची कोरोना रॅपिड अँटिजेन तपासणी करण्याबाबत वैद्यकीय पथकास सांगितले. त्यानुसार रविवारी  या आरोपींची तपासणी करण्यात आली. ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे, असे या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

जामिनावर मुक्तता झालेल्या दोन आरोपींना श्रीगोंदा येथील  कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

या आरोपीच्या संपर्कात असलेले पोलीस व जेवण पुरविणारे कर्मचारी यांची कोरोनाची तपासणी होणार आहे. सर्व आरोपींना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.  

Web Title: Coronation of 35 accused in Upakaragriha; 34 people moved to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.