कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:21 AM2021-07-26T04:21:36+5:302021-07-26T04:21:36+5:30

नेवासा फाटा : नेवासा तालुका शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून कोरोनाच्याने मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उषाताई सुनीलराव ...

Corona distributed educational materials to the children of those who died | कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next

नेवासा फाटा : नेवासा तालुका शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून कोरोनाच्याने मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उषाताई सुनीलराव गडाख यांच्या हस्ते पार पडला. हा कार्यक्रम ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पार पडला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वड, पिंपळ, कडूनिंब, गुलमोहराचे एकेक रोपाचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे सभापती रावसाहेब कांगुने होते. यावेळी उपसभापती किशोर जोजार, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, तहसीलदार रूपेश सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पंचायत समिती सदस्य कैलास झगरे, नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे, शिक्षक बँक संचालक राजेंद्र मुंगसे, विस्ताराधिकारी शिवाजीराव कराड, विद्यादेवी सुंबे, नवनाथ फाटके, पांडुरंग काळे, संजय लाड, संदीप जंगले, बथुवेल हिवाळे, भास्कर नरसाळे, दशरथ ढोले, रामेश्वर चोपडे, सुनीता कर्जुले, सुप्रिया झिंजुर्डे, सुमन तिजोरे, सचिन इंगळे, रवींद्र पागिरे, सतीश भोसले, शमी शेख, मदन लाड, महादेव घोडके, गणेश लाड, सचिन खारगे, ज्ञानदेव जाधव, सचिन बेळगे, विजय पुंड उपस्थित होते. सूत्रसंचालन आदर्श शिक्षक डॉ. रेवननाथ पवार यांनी केले. राजेंद्र मुंगसे यांनी आभार मानले.

250721\img-20210725-wa0003.jpg

नेवासा फाटा: नेवासा तालुका शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून कोरोनाच्या आजाराने मयत झालेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उषाताई सुनीलराव गडाख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न झाला.

Web Title: Corona distributed educational materials to the children of those who died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.