वंचित जामखेड शहरात कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:16+5:302021-04-23T04:23:16+5:30

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरात कोरोना जनजागृती रॅली जामखेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. अरुण जाधव ...

Corona awareness in deprived Jamkhed city | वंचित जामखेड शहरात कोरोना जनजागृती

वंचित जामखेड शहरात कोरोना जनजागृती

Next

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरात कोरोना जनजागृती रॅली

जामखेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली जामखेड येथील युवकांकडून कोरोनाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.

शहरासह परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील कोरोनाबाबतची भीती कमी करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. लोकांनी घाबरून जाऊ नये, विनाकारण गर्दी न करता शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जाधव यांनी केले. जनजागृतीपर रथ बनविण्यात आला होता.

यावेळी लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, वंचितचे तालुकाध्यक्ष आतीश पारवे, सामाजिक कार्यकर्त्या द्वारकताई पवार, वैजीनाथ केसकर, अंकुश पवार, अजिनाथ शिंदे, संतोष चव्हाण, सागर भांगरे, राजू शिंदे, राकेश साळवे, दीपक माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Corona awareness in deprived Jamkhed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.