प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमावर बांधकामाचा राडारोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:15 AM2021-06-20T04:15:29+5:302021-06-20T04:15:29+5:30

शहर व परिसरात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना टाकाऊ बांधकाम साहित्य हे नदीपात्रात, ...

Construction radar at the confluence of Pravara-Mahalungi | प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमावर बांधकामाचा राडारोडा

प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमावर बांधकामाचा राडारोडा

googlenewsNext

शहर व परिसरात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना टाकाऊ बांधकाम साहित्य हे नदीपात्रात, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत टाकण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण होतो. अकोले नाक्यावरील म्हाळुंगी नदीच्या पुलाखाली मेलेल्या कोंबड्यांची घाण टाकली जाते. अकोले नाक्याजवळ नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी उद्यान बांधले आहे. या उद्यानासमोर तसेच पुढे काही अंतरापर्यंत घाण, मेलेल्या जनावरांचे अवशेष टाकले जात असल्याने येथे नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. तोडलेली झाडे, बांधकामाचा राडारोडा येथे मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. या रस्त्यावर रात्री अनेकदा अंधार असतो. म्हाळुंगी नदीवर बांधलेल्या संरक्षक भिंतीवर अनेक जण दारू पीत, गांजा ओढत बसलेले असतात. येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. अनेकदा येथेही वाद होतात. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गस्त वाढवून भितींवर दारू प्यायला व गांजा ओढत बसलेल्यांवर कारवाई करावी,

अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जुनी बांधकामे पाडल्यानंतर त्याचा राडारोडा ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक व इतर वाहनांमध्ये भरून कुठेही मोकळ्या जागेत नेऊन टाकला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी बांधकामाच्या राडारोड्याचे ढीग पडलेले दिसतात. या विषयी संगमनेर नगर परिषदेने धोरण ठरविणे गरजेचे आहे. बांधकामाचा राडारोडा सुयोग्य पद्धतीने गोळा करून त्यावर प्रक्रिया केल्यास वेगळ्या झालेल्या बांधकाम संसाधनांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. त्यामुळे बांधकामाच्या राडारोड्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.

-----------------

पर्यावरणाला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य नागरिकांनी करू नये. बांधकामाचा राडारोडा कुठेही फेकू नये. असे करताना कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बांधकामाचा राडारोडा असल्यास संगमनेर नगर परिषदेशी संपर्क करावा.

डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद, संगमनेर

.......फोटो नेम : १९ संगमनेर बांधकाम

ओळ : प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमावर बांधकामाचा राडारोडा फेकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Construction radar at the confluence of Pravara-Mahalungi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.