कोपरगावात १० हजार गणेश मुर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 05:39 PM2017-09-06T17:39:02+5:302017-09-06T17:39:10+5:30

कोपरगावात राबविलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन’ उपक्रमात सुमारे १० हजार गणेश मुर्तींचे संकलन झाले.

Collection of 10 thousand Ganesh idols in Kopargaon | कोपरगावात १० हजार गणेश मुर्तींचे संकलन

कोपरगावात १० हजार गणेश मुर्तींचे संकलन

Next

कोपरगाव : समता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लबच्या वतीने राबविलेल्या कोपरगावात राबविलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन’ उपक्रमात सुमारे १० हजार गणेश मुर्तींचे संकलन झाले. 
समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांनी संकलित केलेल्या गणेश मूर्ती बुधवारी गोदावरी इंडस्ट्रियल वर्क्सच्या प्रांगणात तहसीलदार किशोर कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, समता परिवाराचे प्रमुख काका कोयटे, दिलीप दारूणकर, दिनेश दारूणकर, नगरसेवक रवींद्र पाठक, सत्येन मुंदडा, संचालक मोहन झंवर, तुलसीदास खुबाणी, लायन्सचे अध्यक्ष सुरेश शिंदे, किरण शिरोडे, सुहासिनी कोयटे, संदीप कोयटे, स्वाती कोयटे, प्रसाद कातकाडे, मारूती काकड आदी उपस्थित होते. शहर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी पालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जन शांततेत झाल्याचे सांगून समता व लायन्सच्या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आभार मानले. व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी प्रास्ताविक केले. राम थोरे यांनी सूत्रसंचालन केले.
खडू, खत निर्मिती होणार
संकलित गणेश मुर्तींचे हौदात अमोनियम कार्बोनेटद्वारे विघटन करून खत व खडू निर्मिती केली जाणार आहे. समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात शाडू मातीपासून ८०० गणेश मूर्ती बनविल्या. दुस-या टप्प्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदी पात्रात विसर्जित न करता समता व लायन्स क्लबकडे देण्यासाठी प्रबोधन केले. तिस-या टप्प्यात गणेश मुर्तींचे संकलन केले.

Web Title: Collection of 10 thousand Ganesh idols in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.