शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

चौंडीतील गोंधळ : ३५ जणांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 10:42 AM

तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोकअहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला व पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. या प्रकरणी सुरेश ऊर्र्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम जि.उस्मानाबाद) यांच्यासह ३५ ते ४० आरोपींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे व इतर कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोकअहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला व पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. या प्रकरणी सुरेश ऊर्र्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम जि.उस्मानाबाद) यांच्यासह ३५ ते ४० आरोपींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे व इतर कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पाच पोलीस जखमी झाले होते. या सर्वांना कर्जतच्या न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. सोमवारी या आरोपींना जामखेड न्यायालयात आणले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली.या आरोपींना न्यायालयात आणणार असल्यामुळे सोमवारी पाच ते सहा जिल्ह्यांतील धनगर समाजबांधव उपस्थित होते. त्यामुळे न्यायालय, तहसील व पोलीस ठाणे परिसराला गर्दीचे स्वरूप आले होते. होळकर जयंती कार्यक्रमात सुरेश कांबळे व डॉ. इंद्रकुमार भिसे, रवी देशमुख हे गोंधळ घालणार असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर या तिघांना ३० व ३१ मे रोजी जिल्हाबंदी करण्यात आली होती.३१ मे रोजी दुपारी सभेच्या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास सुरेश ऊर्फ सूर्यकांत कांबळे हा ७० ते ८० कार्यकर्त्यांसह सभा मंडपात आला. सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सुरेश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली. पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांना पकडण्यात आले, अशी फिर्याद पोलिसांनी दाखल केली होती.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड