शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

जामखेडमधील ‘त्या’ तीन व्यक्तींच्या कुटुंबातील ३२ जणांची नगरला तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:51 PM

जामखेड : येथील धार्मिक स्थळावर थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. यामुळे ...

जामखेड : येथील धार्मिक स्थळावर थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. यामुळे प्रशासनाने या तीन पॉझिटिव्ह व्यक्तींच्या कुटूंबातील ३२ जणांना रात्रीच अहमदनगर येथे तपासणीसाठी तातडीने रवाना केले आहे. जामखेड शहरात एकाच दिवशी तीन पॉझिटिव्ह निघाल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. आता घराबाहेर पडू नका एवढाच उपाय असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परदेशातील नागरिकांना तब्बल अकरा दिवस ठेवले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  शहरात अकरा दिवस थांबलेल्या परदेशी व्यक्तींपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेडमधील ३२ जणांना तपासणी करण्यासाठी नगर येथे दोन दिवसापूर्वी प्रशासनाने घेऊन गेले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी आला असता त्यातील तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या नागरिकांना आता घरातच क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. मंगळवारी जाहीर झालेले तीन पॉझिटिव्ह जामखेड शहरातील राहणारे आहेत. त्यामुळे फक्त जामखेडमधील पॉझिटिव्हची संख्या पाच झाली आहे     तीन जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तहसील, पोलीस, आरोग्य व नगरपरिषद अधिकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये तीन पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपूर्ण कुटूंबाला तपासणीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय झाला.            

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल