दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:52 PM2019-06-05T15:52:48+5:302019-06-05T15:53:03+5:30

तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़

 In the city of drought, Amaharai in the city | दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

Next

अरुण वाघमोडे
अहमदनगर : तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़ घरासमोरील झाडांना लगडलेले आंबे सध्या लक्ष वेधून घेत आहेत़ यंदा निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ आहे़ लवकर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे़ नगरकरांनी घरासमोर लावलेली आंब्याची झाडे दुष्काळातही मुलांसारखी वाढविल्याने त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे़ हलक्या प्रतिच्या आणि मुरमाड जमिनीत आंब्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात़ साधारण पाच ते सहा वर्षांत या झाडांना फळे येतात़ शहरातील बहुतांश परिसरातील जमीन ही हलक्या प्रतिची आहे़ त्यामुळे सारसनगर, केडगाव, बुरुडगाव रोड, सावेडी परिसर, बोल्हेगाव, नागापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे दिसतात़ घरोघरी एक किंवा दोन आंब्याची झाडे आहेत़ विशेष म्हणजे यंदा वादळाचा फटका न बसल्याने बहरलेल्या आंब्याची गळती झाली नाही़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.

हापूस, केशर, कलमी, गावरान आंब्याची झाडे
नगरमध्ये घरासमोर इतर फळझाडांसह हापूस, केशर, कलमी व गावरान आंब्याची झाडे दिसतात़ गावरान आंब्याचे झाड मोठ्या प्रमाणात वाढते त्याचे फळ आकाराने लहान व खाण्यास गोड असते़ नगरकरांच्या या वृक्षप्रेमामुळे शहरातील अनेक परिसर हिरवाईने नटलेले दिसतात़


नगर शहर परिसरात तसे पावसाचे प्रमाण कमी असते़ मात्र घरगुती वापराच्या पाण्यावर आंब्याची झाडे चांगली येतात़ या झाडांना अपेक्षित जमीन असल्याने झाडांची वाढ लवकर होऊन रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही़ त्यामुळे नगरमध्ये बहुतांश ठिकाणी घरासमोर मोठमोठी आंब्याची झाडे निदर्शनास येतात़ -पंडित लोणारे, कृषीतज्ज्ञ

Web Title:  In the city of drought, Amaharai in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.