Child killed in leopard attack; Sensation in Pathardi with the death of two children in the same week | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू ; एकाच आठवड्यात दोन मुलांच्या मृत्यूने पाथर्डीत खळबळ

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू ; एकाच आठवड्यात दोन मुलांच्या मृत्यूने पाथर्डीत खळबळ

पाथर्डी : शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याच्या हल् ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल् ल्यात मृत्यूृ पावलेल्या मुलाचे नाव आहे. सक्षम हा शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या पडवीत झोपला होता.  रविवारी पहाटे त्यास  बिबट्याने हल्ला करून त्यास पळवून नेले.

 नातेवाईक व वनविभागाच्या मदतीने पहाटेपासून शोध घेण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह शेजारीच असलेल्या तुरीच्या पिकात आढळून आला आहे. त्याचा मृतदेही अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे. 

 सदरील बिबट्या वनविभागाच्या कर्मचाºयाला पाहतात पळून गेला. आठवडाभरात बिबट्याने दोन बालकांची हत्या केल्याने परिसरात हळहळ  व्यक्त होत आहे.  बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत.

Web Title: Child killed in leopard attack; Sensation in Pathardi with the death of two children in the same week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.