शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

शेवगाव नगरपरिषदेत गैरव्यवहार; चौकशीसाठी नगरसेवकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:12 PM

शेवगाव : शेवगाव नगर परिषदेत निरनिराळ्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत अर्ज देऊनही दप्तर चौकशीमध्ये होणाºया दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपाचे नगरसेवक अरुण मुंढे, शारदा काथवटे यांनी मंगळवारी शेवगाव येथे सुरु केलेले बेमुदत उपोषण कामांची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यांतर मागे घेतले.शेवगाव नगरपरिषदेमधील वाणिज्य विभागाच्या नोंदी व दप्तराची चौकशी वसुली विभागातील घरपट्टी व ...

शेवगाव : शेवगाव नगर परिषदेत निरनिराळ्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत अर्ज देऊनही दप्तर चौकशीमध्ये होणाºया दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपाचे नगरसेवक अरुण मुंढे, शारदा काथवटे यांनी मंगळवारी शेवगाव येथे सुरु केलेले बेमुदत उपोषण कामांची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यांतर मागे घेतले.शेवगाव नगरपरिषदेमधील वाणिज्य विभागाच्या नोंदी व दप्तराची चौकशी वसुली विभागातील घरपट्टी व पाणीपट्टी यामधील तफावत तसेच ७/१२ व ८ अ या दप्तरामध्ये झालेल्या नोंदी, टँकरव्दारे पाणी पुरवठा, पाईप लाईन व वॉल लिकेज तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मागील ग्रामीण पंचायतीच्या काळातील अंतिम देयक आदी विविध कामांमध्ये झालेल्या गैर व्यवहाराची चौकशी व्हावी, याबाबत नगरसेवक मुंढे यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज दिला होता. व नगरसेवक मुंढे व काथवटे यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले.नगरसेवक कमलेश गांधी, विनोद मोहिते, महेश फलके, नितीन दहिवाळकर, तुषार वैद्य, कचरू चोथे, गणेश कराड, कॉ.संजय नांगरे, अविनाश देशमुख, दिगंबर काथवटे, अशोक ससाणे आदी कार्यकर्त्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता.दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून नगरपरिषदेचे वाणिज्य रजिस्टर व पाणी पुरवठा योजनेच्या देयकाची संचिका ताब्यात घेण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी आपल्या अर्जाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्या नंतर बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे मुंढे यांनी जाहीर केले. याबाबत दिरंगाई दिसून आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावMuncipal Corporationनगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार