शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

जिल्ह्यातील खरिपात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:59 PM

१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात.

गोरख देवकरअहमदनगर : १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. उशिरा का होईना कर्नाटकच्या किनाऱ्यावर आलेला मान्सून ‘वायू’ वादळामुळे पुन्हा रेंगाळला आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसह बियाणे, खते यांचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट पुन्हा गडद झाले आहे.भीषण दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा तरी २४ ते २५ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळ, वाºयाने झालेले नुकसानच अधिक अशी अवस्था आहे. हा पाऊस अल्प दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांची बाजरीला सर्वाधिक पसंती असते. याशिवाय शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा परिसरात कपाशीची लागवड प्रामुख्याने केली जाते. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद लागवड होते.श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. पारनेर तालुक्यात वाटाणा, मूग लागवड सर्वाधिक होते. जिल्ह्यात नियमित खरिपाचे क्षेत्र ४ लाख७८ हजार ६३८ हेक्टर असते. यंदा २०१९ मध्ये खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर आहे. त्यासाठीचे बियाणे, खतांचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, वाटाणा, कपाशी पिकांच्या पेºयामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पेरणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना मार्गदर्शनराज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांची लागवड, रोग, त्यावरील उपाययोजनांबाबत ‘रोहिणी नक्षत्र पंधरवाडा’ उपक्रम राबविण्यात आला. ५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.च्यावेळी मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंड अळी, उसावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली.दीड लाख मेट्रिक टन खतेच्खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख २ हजार ४५१ मेट्रिक टन खतांची कृषी विभागाने मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८६० मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. यामध्ये युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना ३६ हजार ५५५ क्विंटलचा पुरवठा झाला आहे.कपाशीची ३ लाख ३४ हजार ८२२ पाकिटेजिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७५ हजार ९२९ कपाशी बियाणे पाकिटाची नोंद केली होती. त्यानुसार ३ लाख ३४ हजार ८२२ बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय