शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:28 PM

एस.टी.बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. परंतु बस पुलावरून उलटण्याच्या अगोदर चालक विजय कारखिले प्रसंगावधान दाखवून हॅण्ड ब्रेक लावले. त्यामुळे सुमारे ४५ शाळकरी मुलांचे व प्रवाशांचे प्राण वाचले.

श्रीगोंदा : एस.टी.बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. परंतु बस पुलावरून उलटण्याच्या अगोदर चालक विजय कारखिले प्रसंगावधान दाखवून हॅण्ड ब्रेक लावले. त्यामुळे सुमारे ४५ शाळकरी मुलांचे व प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेलवंडीनजीक शिंदेवाडीनजीक घडली.  श्रीगोंदा-शिरुर ही श्रीगोंदा आगाराची बस (बस क्रमांक एम.एच-४०,एन-८७४५) बेलवंडी, उक्कडगाव, चोभेवस्ती, पिंपरी चौफुलाकडे जाणारी शाळकरी मुले घेऊन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  चालली होती. यावेळी बस बेलवंडीजवळील शिंदेवाडी येथील एका पुलाजवळ आली असता बसचे स्टेअरिंग नादुरुस्त झाले. परंतु मोठा अपघात होण्याच्या अगोदर काही क्षण चालक विजय कारखिले यांनी हॅण्ड ब्रेक लावून बस थांबविली आणि प्रवाशांचा जीव वाचविला. श्रीगोंदा बसचे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. ही बस तपासणीसाठी नगर येथील वर्कशॉपमध्ये पाठविली आहे. स्टेअरिंग रॉड का? तुटला याची तपासणी होणार आहे? यानंतरच ही बस पुन्हा रस्यावर येणार आहे, असे प्रवीण शिंदे यांनी सांगितले. बसचा अपघात होण्यापूर्वीच हॅण्ड ब्रेक लावले. यामुळे सुमारे ६५ प्रवाशांचा जीव वाचविला. त्याबद्दल बसचालक विजय कारखिले यांचा श्रीगोंदा आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कारखिले यांनी बसचालक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली याबद्दल त्यांचे प्रवाशांनीही कौतुक केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाBus DriverबसचालकAccidentअपघात