शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

श्वास घ्यायला त्रास होतोय...मग आली आहेत ही आॅक्सिजन यंत्र

By सुदाम देशमुख | Published: September 27, 2020 12:20 PM

अहमदनगर : कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आॅक्सिजन सिलेंडरचा राज्यभरात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून घरच्या घरीच वापरता येतील असे आॅक्सिजन स्प्रे आणि पाण्यापासून आॅक्सिजन निर्मिती करणारे ‘आॅक्सिजन कन्व्हर्टर’ बाजारात दाखल झाले आहेत. 

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्कपासून ते रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंत वैद्यकीय साहित्य विक्री सध्या जोमात आहे. त्यात आता विविध कंपन्यांच्या आॅक्सिजन यंत्रांची भर पडली आहे. द्रवरुपातून वायूरुपात आॅक्सिजन तयार करणारे राज्यात मोजकेच प्रकल्प आहेत. याच प्रकल्पातून राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना द्रवरुप आॅक्सिजनचा पुरवठा केला जाते. स्थानिक प्रकल्पात द्रवरुपातून वायूरुपात आॅक्सिजन सिलेंडरमध्ये भरून तो विकला जातो. या सिलेंडरची टंचाई राज्यभर आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता ही आॅक्सिजन यंत्रे रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहेत. 

सध्या काही सामाजिक संस्थांनीही कोविड सेंटर, रुग्णालयांना अशी यंत्रे भेट देऊन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, तर काहींनी ही यंत्रे भाड्याने देण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. घरगुती वापरासाठीही या यंत्रांची खरेदी केली जात आहे.

आॅक्सिजन स्प्रेकिंमत- ५५० रुपये अधिक जीएसटी, वापर- दर अडीच तासांनी नाकावर स्प्रे मारणे, क्षमता- १२ लिटर, मुंबईमध्ये अनेक कंपन्यांकडून निर्मिती.

आॅक्सिजन कन्व्हर्टरकिंमत- ३२,७०० रुपये अधिक जीएसटी, वापर- गरजेनुसार व पंख्यासारखा वेग वाढवून आॅक्सिजन तयार करता येतो. विजेवर चालणारे हे उपकरण आहे. यंत्राच्या दोन नळ््या दोन्ही हातांनी नाकपुड्यासमोर धरून श्वास आत घेतला जातो. सहा तास सलग आॅक्सिजन मिळतो. क्षमता- ५०० एम. एल.पाणी, गरजेनुसार यंत्रात पाणी टाकून आॅक्सिजन तयार केला जातो. थायलंड, इटलीमध्ये यंत्रांची निर्मिती

आॅक्सिजन कॅन व आॅक्सिजन सिलेंडरच्या पुरवठ्यावरील संपूर्ण नियंत्रण शासनाकडे गेले आहे. त्यामुळे घरगुती आॅक्सिजन निर्मिती करणाºया यंत्रांना मागणी वाढली आहे. इमारत किंवा सोसायटीतील रहिवासी सामुदायिकपणे कन्व्हर्टर खरेदी करीत आहेत.     -संदीप सुपेकर, स्थानिक विक्रेते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स