पुढील अडीच वर्षे भाजप सत्तेत सहभागी राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:21 AM2021-04-08T04:21:46+5:302021-04-08T04:21:46+5:30

अहमदनगर : आगामी महापौरपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच भारतीय जनता पक्षही पुढील अडीच वर्षे सत्तेत राहील, असा ...

BJP will remain in power for the next two and a half years | पुढील अडीच वर्षे भाजप सत्तेत सहभागी राहील

पुढील अडीच वर्षे भाजप सत्तेत सहभागी राहील

Next

अहमदनगर : आगामी महापौरपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच भारतीय जनता पक्षही पुढील अडीच वर्षे सत्तेत राहील, असा दावा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बुधवारी येेथे केला.

महापालिकचे सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. याप्रसंगी कर्डिले बोलत होते. स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, मनोज दुलम, कुमार वाकळे, उदय कराळे, विलास ताठे, ऋग्वेद गंधे, धनंजय गाडे, विठ्ठल बारस्‍कर, महादेव बारस्‍कर, अशोक वाकळे, भाऊ बारस्‍कर,साहिल वाकळे, बाळासाहेब बारस्‍कर, प्रकाश गोसावी, पुष्‍कर कुलकर्णी, बाबासाहेब भिंगारदिवे, अमोल गायकवाड, अखिल शेख, महेश कराळे, बाळासाहेब वाकळे, अविनाश कर्पे, गणेश वाकळे आदी उपस्थित होते. सभागृह नेते बारस्कर म्हणाले, शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. नगर शहरावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजनांना गती दिली जाणार आहे.

--

फोटो- ०७ रवींद्र बारस्कर

Web Title: BJP will remain in power for the next two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.