शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

भाजप सहकार गाडायला निघालाय - भालचंद्र कांगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 7:04 PM

भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे.

अहमदनगर : देशात महाराष्ट्राच्या सहकाराचा नावलौकिक आहे. परंतु आता भाजपसह काँग्रेसही सहकाराच्या मुळावर उठलाय. भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे. म्हणजे दोघांनीही सहकार गाडायचे ठरवले आहे, अशी घणाघाती टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भालचंद्र कांगो यांनी केली.शनिवारपासून सुरू झालेल्या भाकपच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन कांगो यांच्या हस्ते मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, कामगार नेते मिलिंद रानडे, कॉ. बाबा आरगडे, महेबूब सय्यद, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, शांताराम वाळुंज, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, स्मिता पानसरे, शिवाजी देवढे, ज्ञानदेव पांडुळे, कॉ. बहिरनाथ वाकळे, कॉ. शंकर न्यालपेल्ली, संजय नांगरे, राधेशाम गुंजाळ, वैभव शिंदे आदींसह कामगार, कष्टकरी उपस्थित होते.कांगो यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देत भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. या फॅसिस्ट सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. काही आर्थिक संकट आलं की आपले पंतप्रधान त्याला जगातील घडामोडींचा परिणाम म्हणून सांगतात अन् चांगलं झालं की आपल्यामुळे झाल्याचा आव आणतात. गेल्या काही दिवसांत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या धोरणांना कंटाळूनच महाराष्ट्रातील शेतकºयांनी अभूतपूर्व संप केला. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु त्यातही लबाडी केली. त्यामुळे हे फेकू सरकार आहे. द्यायचे काहीच नाही, केवळ घोषणा करायच्या असा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे, असे ते म्हणाले.कम्युनिस्ट पक्षाचा विकासाला कधीच विरोध नव्हता, यापुढेही राहणार नाही. परंतु विकास लोकहिताचा असावा. पक्षाने कायम कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला. यापुढेही करत राहील, कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी, तसेच पक्षवाढीसाठी सदैव तयार राहावे, असे आवाहन कांगो यांनी केले.जिल्हास्तरानंतर पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन पुढील महिन्यात शहादा (जि. नंदुरबार)येथे, तर राष्ट्रीय अधिवेशन एप्रिलमध्ये केरळला होणार असल्याची माहिती लांडे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाcongressकाँग्रेस