शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात दुस-या दिवशीही ठिकठिकाणी बंद, मोर्चे, तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:22 PM

सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस फोडल्या. 

अहमदनगर : सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद बुधवारी सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस फोडल्या. नगर शहरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नेप्ती कांदा मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. मार्केटमध्ये आलेल्या कांद्याचे गुरुवारी सकाळी अकरा वाजता लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले.जामखेड तालुक्यातील जवळा येथे सात वाजण्याच्या सुमारास जामखेड-करमाळा बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. जवळा येथील बंदला हिंसक वळण मिळाले असून, क्रांती ज्योती दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. तसेच दूध ओतून देण्यात आले. जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, खर्डा, नान्नज, अरणगाव, सोनेगाव, हळगाव, जातेगाव, दिघोळ आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे कडकडीत बंद पाळून गावात निषेध रॅली काढण्यात आली. म्हैसगाव सकाळपासून बंद पाळण्यात आला.

पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी बंद पाठण्यात आला. ढवळपुरी, भाळवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. पारनेर एस. टी. आगार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. निघोजमध्ये शांतता असल्याचे सांगण्यात येते.नगर तालुक्यातील निंबळक, इसळक, जेऊन येथे बंद पाळण्यात आला.श्रीगोंदा तालुक्यातील कडकडीत बंद पाळण्यात आला. टाकळी कडेवळीत व मांडवगण वगळता इतर मार्गावरील बसेस सुरु असल्याचे सांगण्यात येते.संगमनेरमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शासनाच्या निषेधार्थ संगमनेर शहरात रॅली काढण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

शाळांना अघोषित सुट्टी

अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे जे विद्यार्थी शाळेत पोहोचले होते, त्यांनाही पुन्हा घरी परतावे लागले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonभीमा-कोरेगाव