शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
3
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
4
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
5
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
6
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
7
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
8
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
9
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
10
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
11
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
12
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
13
'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
15
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
16
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
17
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
18
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
19
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
20
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 

बाळासाहेब थोरात यांचे कुटुंबीयांसमवेत मतदान; उत्कर्षा रूपवते यांचे रांगेत उभे राहून मतदान

By शेखर पानसरे | Published: May 13, 2024 10:27 AM

लोकमत न्यूज नेटवर्क  संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी ( दि.१३) मतदान होते आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात ...

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी ( दि.१३) मतदान होते आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८७ टक्के इतके मतदान झाले.

  काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संगमनेर तालुक्यातील त्यांच्या जोर्वे गावात मतदान केले. आमदार थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात, कन्या कर्करोग तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, बंधू इंद्रजीत थोरात, आरती थोरात आदींनी मतदान केले. 'लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक आहे. या उत्सवात आज सहकुटुंब सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आपणही मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाही समृद्ध करा' असे आवाहन आमदार थोरात यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले शहरातील मराठी शाळेत मतदान केले. त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.