संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाने बाजरी, भुईमूग पिके भूईसपाट;  शेतीचे बांधही फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:02 PM2020-07-24T14:02:47+5:302020-07-24T14:03:47+5:30

संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे गुरुवारी (२३ जुलै) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे.

Bajra, groundnut crops in Sangamner taluka due to heavy rains; Agricultural dams also burst | संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाने बाजरी, भुईमूग पिके भूईसपाट;  शेतीचे बांधही फुटले

संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाने बाजरी, भुईमूग पिके भूईसपाट;  शेतीचे बांधही फुटले

googlenewsNext

घारगाव :  संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे गुरुवारी (२३ जुलै) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे.

घारगाव,अकलापूर, खंदरमाळ, बोरबन आदी गावांच्या परिसरात गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. 

परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे बांधही फुटले आहेत. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत या शेतांमधून पाणी वाहत होते. 

.

Web Title: Bajra, groundnut crops in Sangamner taluka due to heavy rains; Agricultural dams also burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.