अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोकोचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:48+5:302021-02-20T04:55:48+5:30

अहमदनगर : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र ...

Attempt of Railway Rocco at Ahmednagar Railway Station | अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोकोचा प्रयत्न

अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोकोचा प्रयत्न

Next

अहमदनगर : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नगर येथील रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले.

दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकूमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत आहे. याचा गुरुवारी दुपारी नगर येथील रेल्वे स्थानकावर निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. आंदोलकांना प्रवेशद्वारातच अडवून रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव कॉम्रेड सुभाष लांडे, मारुती भापकर, बन्सी सातपुते, सुधीर टोकेकर, आर्किटेक अर्शद शेख, संजय नांगरे, फिरोज शेख, सतीश पवार, सलीम सय्यद, भारती न्यालपेल्ली, लक्ष्मी कोटा, शारदा बोगा, सिंधूताई त्र्यंबके, कमल दोंता, सुभाष शिंदे, गंगाधर त्र्यंबके, सुरेश पानसरे, महेबूब सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे सहभागी झाले होते. शेतकरीविरोधी कायदे रद्द करून शेतीमालाला किमान आधारभूत किंमत कायदा करावा, अशी मागणी करीत आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

-------------

फोटो-

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रेल्वेकडे जाण्यापासून अडवले.

Web Title: Attempt of Railway Rocco at Ahmednagar Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.