शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

बेलापूर-नेवासा-परळी रेल्वे मार्गाला मंजुरीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककुकाणा : बेलापूर- परळी रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे काम प्रगतीपथावर असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत सर्व्हे पूर्ण करुन बेलापूर- नेवासा- शेवगाव- गेवराई - बीड - परळी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाचे शासकीय अधिकारी विजय पिंगळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे व शिष्टमंडळाला दिले.खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर- ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुकाणा : बेलापूर- परळी रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे काम प्रगतीपथावर असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत सर्व्हे पूर्ण करुन बेलापूर- नेवासा- शेवगाव- गेवराई - बीड - परळी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाचे शासकीय अधिकारी विजय पिंगळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे व शिष्टमंडळाला दिले.खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर- परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेची बैठक दिल्ली येथे नुकतीच पार पडली. बैठकीस पिंपळे व अधिकारी उपस्थित होते. बेलापूर- परळी या मार्गाचा बेलापूर- नेवासा- शेवगाव- गेवराई - बीड - परळी असा सर्व्हे होणे अपेक्षित असताना तो शेवगावपासून पाथर्डी, राजुरी, रायमोह मार्गे बीड असा करण्यात आला. केलेला सर्व्हे चुकीचा असल्याने तसेच डोंगराळ भागातून जात असल्याने हा मार्ग न परवडणारा आहे, असा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. सेवा संस्थेने याला हरकत घेऊन ४ जुलै रोजी सोलापूर विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते. या संदर्भात खा.लोखंडे यांनीही बैठक आयोजित केली होती.दरम्यान, त्यानंतर सदरची बैठक दिल्ली येथे रेल्वे भवन येथे घेण्यात आली. बैठकीत खा.लोखंडे सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, निसार सय्यद, यशवंत एरंडे, गणेश मोढवे, शिवाजी दिशागत आदी उपस्थित होते. बैठकीत पिंगळे यांनी फेब्रुवारीपूर्वी सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच सर्व्हे पूर्ण होताच या मार्गाला मंजुरी देऊन तातडीने हा मार्ग पूर्ण करणार असल्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. नगर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नसल्याची खंत पिंगळे यांनी व्यक्त केली.रेल्वे मंत्र्यांच्या शिर्डी दौºयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही या मार्गाच्या मागणीचे निवेदन तसेच विभागीय रेल्वे अधिकारी, सोलापूर यांच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.