झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:34 PM2019-07-12T15:34:13+5:302019-07-12T15:39:31+5:30

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी म्हणून शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे.

Apply trees and get quarters, officer suspended by munciple officer | झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन

झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन

Next

अहमदनगर - वृक्ष लागवड अभियानाची चळवळ गतीमान होण्यासाठी स्वच्छता विभागातील एका अधिकाऱ्याने भन्नाट डोकं लावलं होतं. पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, अशी ही योजना होती. मात्र, ही योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षख किशोर देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी म्हणून शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. अधिकारीही वेगवेगळ्या गटांना, संघटनांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यासाठी, अहमदनगर महापालिकेच्या स्वच्छता विभागातील एका अधिकाऱ्यानेही भन्नाट योजना आणली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर स्वच्छता निरीक्षक कुमार देशमुख या अधिकाऱ्याने ‘झाड लावा, क्वार्टर मिळवा’ या योजनेची घोषणा केली. पावसाळ्यात लावलेले झाड वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, असे या अधिकाऱ्याने आपल्या व्हॉटस् अ‍ॅपवरील मॅसेजमध्ये म्हटले. विशेष म्हणजे ही योजना फक्त मुकादमांसाठी असल्याचेही म्हटले आहे. हा मेसेज ग्रुपवर आल्यानंतर काही क्षणातच सर्वत्र या ग्रुपचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले. ही अनोखी घोषणा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिका कर्मचारी युनियनने थेट आयुक्तांकडेच तक्रार केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांचे निलंबन केले आहे. 
वृक्षलागवडीच्या नावाखाली दारूचा प्रचार आणि प्रचार होत असल्याचं इतर कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आयुक्तांकडून तातडीने याबाबत कारवाई करण्यात आली.

Web Title: Apply trees and get quarters, officer suspended by munciple officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.