शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

प्राथमिक शाळेत भरला ‘आनंद बाजार’; विद्यार्थ्यांनी केली ५० हजाराची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:05 PM

विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, दीपावलीसाठीच्या आवश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. खाऊगल्लीत तर विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने समोसे, वडापाव, भजेपाव, ढोकळा, इडली सांबर, गुलाबजाम, भेळ यासह मटकी, मूग यापासून बनविलेले खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. अवघ्या दोन तासात बाजारात ५० हजारांची उलाढाल झाली.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील हिवरेबाजार येथील प्राथमिक शाळेत उपक्रमविद्यार्थ्यांनी बनविले चक्क गुलाबजाम, इडली सांगर, ढोकळा, भजे, वडा, समोसे, भेळ अवघ्या दोन तासात बाजारात ५० हजारांची उलाढाल झाली.गेल्या सात वर्षांपासून शाळेत ‘आनंद बाजार’चे आयोजन

केडगाव : नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी चक्क गुलाबजाम, इडली सांगर, ढोकळा, भजे, वडा, समोसे, भेळ असे विविध पदार्थ तयार करुन ‘आनंद बाजार’ भरविला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आकाशकंदील व इतर दिवाळीसाठी लागणा-या वस्तूही तयार करुन विकण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या आनंद बाजारात अवघ्या दोन तासात सुमारे ५० हजार रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र शाळेत दिसले.प्रत्येक शाळेत कृतीशील शिक्षण देणारे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यावेत, असे मत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी हिवरेबाजार प्राथमिक शाळेत आयोजित ‘आनंद बाजार’च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोस्की, केंद्रप्रमुख उत्तम भोसले, ग्रामपंचायत सदस्य रो. ना. पादिर, एस. टी. पादिर, रामभाऊ चत्तर, वसंत कर्डिले, मुख्याध्यापक तुकाराम थिटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गेल्या सात वर्षांपासून शाळेत ‘आनंद बाजार’चे आयोजन केले जात असून पहिल्या बाजारचा मी साक्षीदार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तितकाच उत्साह आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्याचे उपयोजन कसे करायचे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे व यासाठी असे उपक्रम फार महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे म्हणाले की, हिवरेबाजार हे इतरांना दिशा देणारे गाव असून शाळेतील उपक्रम हे इतर शाळांना मार्गदर्शक आहेत. शाळेतील उपक्रमांत सातत्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होईल. पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता निर्माण करून भविष्यात कणखर व निर्णयक्षम नागरिक घडविण्यासाठी, असे उपक्रम राबविले जावेत असे सांगितले. नोकरीच्या मागे न पळता नोकरी निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व घडविले जावेत व त्यासाठी विद्यार्थ्यांना निरनिराळ्या संकल्पना, प्रयोग, उपक्रम राबवून शिक्षण दिले गेले पाहिजे. असे व्यवहारज्ञान बालवयातच मिळाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.बाजारात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरच्या भाजीपाल्यासह तयार केलेले आकाशकंदील, दीपावलीसाठीच्या आवश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. खाऊगल्लीत तर विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने समोसे, वडापाव, भजेपाव, ढोकळा, इडली सांबर, गुलाबजाम, भेळ यासह मटकी, मूग यापासून बनविलेले खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. अवघ्या दोन तासात बाजारात ५० हजारांची उलाढाल झाली. खरेदीसाठी आसपासच्या गावातून ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.शिक्षक भाऊसाहेब ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर विजय ठाणगे यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब नांगरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सुभाष वाबळे, राजू शेख, शोभाताई ठाणगे, सुवर्णा ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरSchoolशाळा