शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हवी हवीशी युती, नको नकोशी

By मिलिंदकुमार साळवे | Published: February 22, 2019 5:12 PM

जमणार, नाही जमणार... अशा चर्चांच्या वावटळीत शिवसेना-भाजपचं अखेर जमलं. राज्यात गेल्या चार वर्षांपासून युतीचं सरकार आहे. पण त्यात भाजप सत्ताधारी.

मिलींदकुमार साळवेअहमदनगर : जमणार, नाही जमणार... अशा चर्चांच्या वावटळीत शिवसेना-भाजपचं अखेर जमलं. राज्यात गेल्या चार वर्षांपासून युतीचं सरकार आहे. पण त्यात भाजप सत्ताधारी. तर शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेतच दिसली. संधी मिळेल तिथं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारवर म्हणण्यापेक्षा भाजपवर टिकेची एकही संधी सोडत नव्हते. त्यांनी स्वबळाचा नारा वेळोवेळी दिला. तसेच ‘कामाला’ लागण्याचे आदेशही आपल्या शिवसैनिकांना दिले होते. भाजपवर त्यांची सतत तलवारबाजी सुरूच होती. शिवसेनेने लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी देखील केली. समोर दोन्ही काँग्रेस व सर्व विरोधक एकवटत असताना सेना-भाजप वेगवेगळे लढल्यास मतांची फाटाफूट होईल. त्यामुळे शिवसेनेच्या साथीशिवाय आपल्याला घवघवीत यश मिळणार नाही, याची खात्री असल्यानेच ‘पटक देंगे’ची भाषा करणाऱ्या भाजपला शिवसेनेशी युती करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळेच राज्यात भाजपचे संकटविमोचक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून युतीची गाठ बांधली. या दोन्ही पक्षांची युती झाली असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनाने युती झालेली नाही.दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या टीका, आरोप, केलेली वक्तव्ये कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळेच नेत्यांच्या पातळीवर कितीही युती झाल्याचा देखावा दाखविला जात असला तरी गाव पातळीवरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने मात्र जुळलेली नाहीत. अगोदरपासूनच सेना असो की भाजप या पक्षांमध्ये दोन्ही काँग्रेसप्रमाणेच अंतर्गत स्थानिक गटबाजीची बाधा झालेली आहेच. त्यामुळेच स्वतंत्र लढल्यास एकमेकांची कशी जिरवता येईल? याचाच विचार कार्यकर्ते करीत होते. युती झाल्यानंतरही शिवसेना कार्याध्यक्ष ठाकरे यांनी ‘लोकमत महाराष्टÑीयन आॅफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात केलेले ‘सोबत आले तर ठिक नाही, तर घेतले शिंगावर’ असे मुख्यमंत्र्यांसमोर मोकळेपणाने सांगून अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे. यातूनच अजूनही युती म्हणजे भाजप-सेनेचे शंभर टक्के मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. पक्ष नेत्यांना युती हवी हवीशी वाटत होती. तर कार्यकर्त्यांना ती नको नकोशी वाटत होती.ती नकोशी का वाटत होती याचे उत्तर राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केलेले सेनेचे माजी जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी दिले आहे. त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेण्याची पूर्ण तयारी केली होती. पण युती झाल्याने अहमदनगरची जागा युतीत भाजपकडेच राहणार आहे. त्यामुळे शेलार यांची शिवसेनेकडून लोकसभा लढविण्याची संधी हुकली. पक्षप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे ते कामाला लागले होते. पण युती झाल्याने आता त्यांचे दोर कापले गेले आहेत. आतापर्यंत भाजपचे खासदार दिलीप गांधींवर टीका करण्यात ते दोन्ही काँग्रेसपेक्षा जास्त आघाडीवर होते. पण युती झाल्यामुळे त्याच गांधींचा प्रचार कसा करणार? असा प्रश्न त्यांना पडला. त्यातूनच त्यांनी युतीच्या निर्णयानंतर दोनच दिवसांमध्ये सेनेला ‘जय महाराष्टÑ’ केला. जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत चितपट करण्यासाठी शड्डू ठोकत आहेत. पण आता त्यांनाही पक्षप्रमुखांचा आदेश पाळावा लागणार आहे.‘आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वबळावर शिवसेना निवडणुकीला सामोरे जाईल, असे जाहीर केले होते. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र शिवसैनिकांना विचारात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता अचानक यू टर्न घेत राज्यात शिवसेना-भाजपची युती जाहीर केली. त्यामुळे राज्यातील लाखो शिवसैनिकांची निराशा झाली. युती करताना शिवसैनिकांना वाºयावर सोडण्यात आले’ अशा भावना शेलारांनी बोलून दाखविल्या आहेत. अशाच भावना कमी अधिक फरकाने राज्यातील शिवसैनिकांच्या मनात दाटल्या आहेत.गाव पातळीवर गल्लीबोळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला तरी त्यांच्याकडून युतीचे मनापासून स्वागत झाल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे आतापर्यंत पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे व इतर नेत्यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली. आता त्याच शिवसेनेतील शिवसैनिकांना बरोबर घेऊन प्रचार करायचा कसा? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना टोचतो आहे. शिवसैनिकांनी जसे युतीचे स्वागत केले नाही, तसे भाजप कार्यकर्त्यांनीही युती झाल्याचे आपल्या नेहमीच्या स्टाईलने जल्लोष करीत फटाके फोडले नाहीत. इव्हेंट साजरा केला नाही. त्यामुळेच नेत्यांना हवी हवीशी युती कार्यकर्त्यांना अजूनही नको नकोशी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.युतीनंतर चेहरे खुलले आहेत, ते विद्यमान पदाधिकारी, आमदार, खासदारांचेच. मतविभागणी टळणार असल्याने आपला हमखास विजय होईल, या आशेवर त्यांचे चेहरे खुलले आहेत. पण युती होताच युतीचे एकत्रीत मेळावे सुरू होण्याऐवजी शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे सुरू झाले आहेत. युतीच्या तहातील वाटाघाटींवरून अजूनही सेना नेते रामदास कदम व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवरून सर्व आलबेल झाल्याचे दिसत नाही. एकूणच नेत्यांना हवी हवीशी युती कार्यकर्त्यांना अजूनही नको नकोशी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा