शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

अहमदनगर मनपाच्या उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकणा-या ठेकेदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:23 PM

विकासकामाच्या फायलीवर सही केली नसल्याच्या रागातून प्रभारी उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकून लाच देण्याचा प्रयत्न करणारा ठेकेदार शाकीर शेख (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : विकासकामाच्या फायलीवर सही केली नसल्याच्या रागातून प्रभारी उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकून लाच देण्याचा प्रयत्न करणारा ठेकेदार शाकीर शेख (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रभारी उपायुक्त दिगंबर कोंडा यांनी फिर्याद दाखल केली आहे. महापालिकेत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडला. ठेकेदार शाकीर शेख याने कोंडा यांच्या दालनात घुसून फायलीवर सही का केली नाही, अशी विचारणा केली. स्थळ पाहणी केल्याशिवाय फायलीवर सही करणार नाही, असे कोंडा यांनी बजावले. मात्र ठेकेदार ऐकण्यास तयार नव्हता. यावेळी शेख याने पैसे घेतल्याशिवाय फाईलवर सह्या होत नसल्याचा आरडाओरडा केला. मात्र ठेकेदाराने कोंडा यांच्या अंगावर पैसे फेकले आणि त्याचे चित्रीकरण केले. तसेच कोंडा यांना शिविगाळ करून विकासकामाची फाईल जबरदस्तीने घेऊन गेला़.या प्रकाराची कोंडा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सदर ठेकेदाराविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. कोंडा यांच्या फिर्यादीनुसार रात्री बारा वाजेच्या सुमारास तोफखाना पोलीसांनी शेख याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सोेने हे करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorतहसीलदार