शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

स्वाक्षरीयुक्त  ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:34 AM

सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे.

पुणे : सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे. पुणे सातव्या क्रमांकावर तर मुंबईसह सिंधूदूर्ग व रत्नागिरी जिल्हा पिछाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत ३९ लाख २४ हजार ६४८ डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे आहेत. त्यातच संगणकीकरणाच्या प्रक्रियेत काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमीनधारक व शेतकºयांना नोव्हेंबर अखेरपर्यंत चुका दुरूस्त करून घेण्याची संधी दिली आहे.परिणामत: डिजिटल स्वाक्षरीच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख ५ हजार ५९४ सातबारा उतारे तयार झाले असल्याचे सांगण्यात आले.मुंबईत देण्यात आले केवळ ७ उतारेअहमदनगर (५,०५,५९४), रायगड (२,८५,२६४), उस्मानाबाद (२,७८,२८०), यवतमाळ (२,७६,४६६), अमरावती (२,३९,६३४), नाशिक (२,३४,९७३), पुणे (२,१२,२८३), बुलडाणा (२,०१,९९८), बीड (२,००,०८७), अकोला (१,८६,७२६), जालना (१,८५,७९२), वाशिम (१,१९,४३१), कोल्हापूर (११७२२७), हिंगोली (१०७२३२), सोलापूर (१०५२८४), लातूरं (९०८७२), गोंदिया (७६९५६), परभणी (५९६२९), भंडारा (५६५०७), ठाणे (५४,१५४), वर्धा (५३,८१५), जळगाव (४८,२७६), नागपूर (४७,८८८), सांगली (४०,०००), नंदूरबार (३९,७३६), औरंगाबाद (३२,५०९), गडचिरोली (३१,९८५), चंद्रपूर (२५,०७९), धुळे (३,९९५), सातारा (३,६७५), पालघर (३,१८७), नांदेड (१०७), मुंबई (७), सिंधूदूर्ग (०), रत्नागिरी (०)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र