शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

बेमुदत उपोषणानंतर शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 7:31 PM

विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

ठळक मुद्देशालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे थकीत व नियमित वेतनासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार (दि.२६) विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते.याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.राज्यात ५ लाख ७० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात येते. शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ही प्रणाली बंद पडली.

अहमदनगर : शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे थकीत व नियमित वेतनासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार (दि.२६) विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.राज्यात ५ लाख ७० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात येते. शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ही प्रणाली बंद पडली. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. डिसेंबरमध्ये ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून झाले, त्या शिक्षकांचेच जानेवारी महिन्याचे वेतन आॅफलाईन पध्दतीने करण्यात आले़ परंतु ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे डिसेंबर पूर्वीचे वेतन अदा झालेले नाही अशांना आॅफलाईन प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात आले नाही. यामुळे अशा शिक्षकांचे थकीत वेतन व नियमित वेतनाचा प्रश्न गंभीर बनला होता .त्यामुळे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी हे उपोषणास बसले होते. याची दखल घेत गाणार, कडू यांच्यासमवेत सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली़ शिक्षकांचे थकीत वेतन देण्याचे परिपत्रक काढतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटल्याची माहिती बोडखे यांनी दिली.शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा़ सुनील पंडित, ग्रामीण अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष शशिकांत थोरात, विनायक कचरे, सचिव तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, जेष्ठ मार्गदर्शक आबा मुळे, प्रा. सुनील सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, बबन शिंदे, निलेश बांगर, नितीन म्हस्के, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, सुरेश विधाते, अरविंद आचारी, अनिल आचार्य, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी आदींनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे बोडखे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक