कोविड सेंटरमधील कोरोना योद्धांना प्रशासनाचा सॅल्युट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:17+5:302021-04-27T04:22:17+5:30

श्रीगोंदा : कोरोनाच्या अस्मानी संकटात श्रीगोंदा तालुक्यात सेवाभावी वृत्तीने कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान ...

Administration salutes the Corona Warriors at the Covid Center | कोविड सेंटरमधील कोरोना योद्धांना प्रशासनाचा सॅल्युट

कोविड सेंटरमधील कोरोना योद्धांना प्रशासनाचा सॅल्युट

Next

श्रीगोंदा : कोरोनाच्या अस्मानी संकटात श्रीगोंदा तालुक्यात सेवाभावी वृत्तीने कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. या सेंटरमध्ये रुग्ण सेवेचा यज्ञ करत असलेल्या डाॅक्टर व स्वयंसेवकांना तालुका प्रशासनाचा सॅल्युट आहे, असे गौरवौद्गार तहसीलदार प्रदीप पवार यांनी काढले.

पवार म्हणाले, तालुक्यातील पावणे सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही समाधानाची बाब आहे. सध्या सातशे कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत.

अशा परिस्थितीत कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसा, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, श्रीगोंदा, आढळगाव येथे कोविड सेंटर्स सुरू केली आहेत. यामध्ये स्थानिक डाॅक्टर व स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य बजावत आहेत. याचा प्रशासनाला अभिमान

आहे.

कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी सेवा बजावताना आरोग्य विभागाच्या गाइडलाइन पाळाव्यात. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले.

Web Title: Administration salutes the Corona Warriors at the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.